पेडगावच्या धर्मवीर गडावर दीपोत्सव साजरा

श्रीगोंदे – दिवाळी पाडव्यानिमीत्त सालाबादप्रमाणे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पेडगाव किल्यात साडेतीन हजार दिवे प्रज्वलीत करून दीपोत्सव साजरा केला. फटाक्‍यांची भव्य गगनचुंबी आतषबाजी करण्यात आली. संभाजी महाराज स्मारक, लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, रामेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, पाताळेश्वर मंदिर व टेकडीवरील नागमोडी (झिगझॅग) पायऱ्यांवरती मोहरी तेलाच्या पणत्या प्रज्ववलीत करून सर्व परिसर प्रकाशमय करण्यात आला.

या वेळी आदिवासी, गरीब कातकरी बांधवांना व गडपालांना दिवाळी फराळाचे व मिठाईचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शिवदुर्ग संवर्धन समिती सदस्य डॉ. निलेश खेडकर, देवेंद्र आवचर, प्रल्हाद जाधव व प्रा. राजेश बाराते यांनी नियोजन करून पार पाडला. तसेच गडपाल नंदू क्षीरसागर, भाऊ घोडके व मच्छिंद्र पंडित यांनी सहाय केले. या कार्यक्रमासाठी प्रविण बाराते सिद्धार्थ खेडकर, शिवाजी नवले, तेजस खेडकर, रोहित कणसे, महेश कराळे, ओंकार खेडकर, सचिन खळदकर, सुनील बोबडे तसेच पेडगाव थोरले, पेडगाव धाकटे व वडगाव दरेकर येथील शिवप्रेमी यांनी महत्वाची भूमीका पार पाडली.

-Ads-

पेडगाव हे श्रीगोंदे तालुक्‍यातील ऐतिहासिक वारसा लाभलेलं महत्वाचे ठिकाण असल्याने, यादव कालखंडात हे ठिकाण भरभराटीला आलेलं होतं, बाबाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे यांच्या कर्तबगारीची साक्ष हा सर्व परिसर आहे. मराठा कालखंडातील शिवाजी महाराज यांनी कुटनीतीने गनिमी कावा दाखवत बहादूरखानाला दोनदा वेड्यात काढले, छत्रपती संभाजीराजेंच्या शेवटच्या अनंत यातनांचा साक्षीदार हा किल्ला आहे.

शिवाजी महाराजांचं गडावरील प्रेम पहाता हे किल्ले भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी जिवंत रहावेत तसेच नवीन पिढीला या ठिकाणी येऊन ऐतिहासिक मार्गदर्शन मिळावे, या हेतूने शिवदुर्ग संवर्धन समिती अंतर्गत गडाचे संवर्धन व जतन कार्य केले जाते, असे समाजोपयोगी उपक्रम राबवून आपला ऐतिहासिक ठेवा जिवंत ठेवला जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)