भावीनिमगाव – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ ग्रामीण पत्रकारांच्या सुरक्षा हेतूने विमा उतराविणार असुन संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी केले.
दैनिक प्रभातचे भावीनिमगाव प्रतिनिधी शंकर मरकड यांची तालुका सरचिटणीसपदी तर अॅड. महेश आमले यांची कायदेशीर सल्लागार पदी निवड करुन इतर सदस्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर दक्षिण कार्याध्यक्ष दीपक खोसे होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांच्या आदेशानुसार व संघटनेचे जेष्ठ सदस्य आर. आर. माने व संजय भालेकर यांच्या मार्गदर्शनात शेवगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांची यापूर्वीच जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीत पुढील तालुका कार्यकारिणी तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी जाहीर करून निवडीचे पत्र नुतन पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : विभागीय उपाध्यक्ष – रामेश्वर तांबे व रमेश खैरे, सरचिटणीस- शंकर मरकड, सहसरचिटणीस- ईश्वर वाघमारे, कार्याध्यक्ष उद्धव देशमुख, सहकार्याध्यक्ष सलिम शेख, प्रसिद्धी प्रमुख – ईसाक शेख, सुप्रसिद्धी प्रमुख – संदीप मोटकर, संघटक – शिवाजी खरड, सहसंघटक- संजय सुपेकर, मार्गदर्शक संजय भालेकर, आर. आर. माने, इलेक्ट्रॉनिक मिडिया संघ अध्यक्ष – रामनाथ रुईकर, उपाध्यक्ष – अशोक वाघ , सरचिटणीस सुनिल रनमले, छायाचित्रकार संघ अध्यक्ष – सोपान जाधव, सरचिटणीस – गणेश शिंदे , पत्रकार संघ कायदेशीर सल्लागार- अॅड. महेश आमले यांच्या निवडी करण्यात आल्या.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा