अटलजींना कार्यातून अमर ठेवावे

आमदार राजळे : पाथर्डी शहरात श्रद्धांजली सभा

पाथर्डी – गावपातळीवरील सर्व विचारांची माणसे विकासासाठी एकत्र यावीत, अशा विकासाच्या माध्यमातून राष्ट्र बलवान, चारित्र्यवान व प्रगतीकडे झेपावणारे व्हावे, यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. अटलजींचे भाषण म्हणजे प्रत्येक विचार ग्रंथासारखा असून प्रत्येकाने त्यांचे विचार आचरणात आणून त्यांना कार्यातून अमर ठेवावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

-Ads-

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोरे मंगल कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर उपस्थित होत्या.

या वेळी आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, अटलजींनी देशाचे नेतृत्व खंबीरपणे केले. त्याबरोबरच देशाला विकासाची नवी विचारधारा दिली. कवी, पत्रकार, साहित्यिक, मुत्सद्दी या पेक्षाही सत्शील माणूस म्हणून जगाला त्यांनी आपल्या व्यक्‍तिमत्त्वाने आकर्षित केले. त्यांच्यातील कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्वाची तुलना कुणाही बरोबर होऊ शकत नाही. अनेक पिढ्यांच्या योगदानातून असे नेतृत्त्व उदयास येते. जागतिक पातळीवरील त्यांची कारकिर्द जगाला नेतृत्वाची चुणूक दाखवणारी ठरली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)