पाथर्डी तालुक्‍यातील आठ खेळाडूंना सुवर्णपदक

पाथर्डी – जिल्हा क्रिडा परिषद, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व तायक्वॉंदो असोशिएशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत तालुक्‍यातील आठ खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले.
केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा क्रिडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरागे व तायक्वॉंदो जिल्हा संघटनेचे सचिव संतोष बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत तालुक्‍यातील आठ खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवून तालुक्‍याचे नाव जिल्हा पातळीवर झळकवले आहे.

यातील सुवर्ण पदक विजेते खेळाडू : पायल आसलकर, आर्या देवढे, प्रणिता देवढे (विवेकानंद विद्या मंदिर पाथर्डी ), गायत्री पवार ( एम एम निऱ्हाळी विद्यालय ), सौरभ दिनकर (श्री तिलोक जैन विद्यालय ), सागर सानप ( एम एम निऱ्हाळी विद्यालय ) रविंद्र बळीद ( न्यु इंग्लिश स्कूल साकेगाव ), निकीता जाधव ( बाबुजी आव्हाड महा विद्यालय ), सिल्व्हर पदक विजेते खेळाडू : नम्रता माने, कांचन वरवडे (श्री तिलोक जैन विद्यालय ), समृद्धी पाथरकर ( श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर ) रोहन बळीद ( न्यु इंग्लिश स्कूल साकेगाव ), ब्रॉझ पदक विजेते खेळाडू : महेश दायमा, नयन चन्ने (श्री तिलोक जैन विद्यालय), आदिती पठाडे ( पार्थ पब्लीक स्कूल ), स्वप्नील घुले (विवेकानंद विद्या मंदिर पाथर्डी ) उदय खुडे ( न्यु इंग्लिश स्कूल साकेगाव). यशस्वी खेळाडूंना पाथर्डी तालुका तायक्वॉंदो ऍकेडमीचे सचिव अंबादास साठे यांचे मार्गदर्शन लाभले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)