पाथर्डी – तालुक्‍यातील पालवेवाडी शिवारातील केकाण वस्तीवर चोरट्यांनी सुमारे 68 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत मधुकर सयाजी केकाण यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की मधुकर केकाण पालवेवाडी येथे करोडीरोड लगत असणाऱ्या केकाण वस्तीवर राहतात. ते घाटशिरस येथील संत तुकाराम विद्यालयात नोकरीला आहेत. रविवारी सुटी असल्याने त्यांनी पत्नीसमवेत शेतीची कामे उरकली. रविवारी दुपारी रक्षाबंधनानिमित्त त्यांची बहीणही आली होती. रात्री जेवण उरकून केकाण परिवार घरात झोपला असताना रविवारी मध्यरात्रीनंतर ते सोमवारी पहाटेच्या सुमारास केकाण यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले.

पहाटे त्यांना जाग आली, तेव्हा घराचे कुलूप तोडून दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरातील दागिन्याचा डबा व बहिणीची पिशवी ओट्यावर पडलेली दिसली. घरातील वस्तूंची तपासणी केल्यानंतर बहिणीच्या गळ्यातील गंठण व पत्नीच्या गळ्यातील दागिने असा मिळून 68 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार अनिल बडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)