पाथर्डीत भुरट्या चोरांचा धुमाकूळ

ग्रामीण भागात चोरट्यामुळे भीतीचे वातावरण

पाथर्डी – तालुक्‍यात भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठे ना कुठे चोरी झाल्याच्या घटना समोर येत आहेत. बुधवारी रात्री माळेगाव परिसरात चोरी झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी रात्री तोंडोळी व कळसपिंपरी परिसरात अनेक वस्त्यांवर जाऊन चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनांमध्ये चोरांच्या हातात फारसे काही लागले नसते तरी चोरीच्या भीतीने नागरिक भयभीत झाले आहेत.

भुरट्या चोरांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देणे नागरिकांनी टाळले आहे. तोंडोळी व कळसपिंपरी परिसरात सुमारे दहा ते बारा ठिकाणी चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. या घटनांपैकी केळव नंदाबाई बबन भराट यांनी घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दोन अंगठ्यासह रोख रुपये असा नऊ हजार रुपये चोरुन नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भराट यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तोंडोळी येथे मी व नातू शंतनु असे दोघेच राहतो, माझी दोन मुले कामानिमित्त बाहेरगावी आहेत. गुरुवारी रात्री जेवण करून आम्ही दोघे घराला कुलूप लावून झोपलो होतो. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लघुशंकेला जाग आली. त्यावेळी घरासमोर लावलेला पत्रा घराच्या मागे पडलेला दिसला. उचलून घरासमोर आणला बॅटरी लावून पाहिले असता घराचे कुलूप तोडून सामानाची उचकापाचक करून पेटीत ठेवलेल्या सहा हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या व तीन हजार रुपये रोख असा नऊ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. भराट यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाऊस लांबल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.डोळ्यासमोर उभी पिके जळत असून दिवसभर जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यातच रात्री भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातल्याने रात्र-रात्र जागून काढावी लागत आहेत. तालुक्‍यात एकाही चोरीच्या घटनेतील आरोपींचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे चोरांचे मनोधैर्य वाढले असून पोलीस ठाण्यापासून लांब अंतरावरील गावांना चोरांनी लक्ष्य केले आहे. पोलिसांनी ग्रामीण भागातही गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)