पाथर्डीत अॅड. ढाकणेंच्या पुतळ्याचे दहन

पाथर्डी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी वंजारी आरक्षण व ऊसतोडणी कामगारांच्या संपा विषयी लोकनेते गोपीनाथ मुंडे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद पाथर्डीत उमटुन भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जुन्या बस स्थानकाजवळील वसंतराव नाईक चौकात अॅड. ढाकणे यांचा पुतळा जाळुन “रास्ता-रोको’ आंदोलन करत निषेधाच्या घोषणा दिल्या.

या आंदोलनामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, येळीचे सरपंच संजय बडे, युवा भाजप युवा मोर्चाचे बीड जिल्हा प्रभारी मुकुंद गर्जे, शहराध्यक्ष अजय भंडारी, नगरसेवक रमेश गोरे, नामदेव लबडे, काशीताई गोल्हार, नगरसेविका मंगल कोकाटे, मनीषा घुले, भगवान साठे, आदीसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलकांनी ऍड. ढाकणे विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला.

यावेळी संजय बडे म्हणाले, 1994 मध्ये औरंगाबाद येथील विश्रामगृहावर वंजारी आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीतील प्रतिज्ञापत्रावर माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांची सुध्दा सही आहे. या विरूद्ध मोठे षडयंत्र असुन मुंडे यांच्या विरोधात बोलल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याकडुन काही मिळेल, अशी अपेक्षा ठेऊन अॅड. ढाकणेंकडून टिका सुरू आहे. ऊस तोडणी कामगारांना लोकनेते गोपीनीथ मुंडे व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खऱ्या अर्धाने न्याय दिला आहे. तुम्हाला मुंडेनी खासदार केले तीन वेळा जिल्हाध्यक्ष केले. दोन वेळा उमेदवारी दिली. कालच्या जिल्हा परिषद निवडणुकीत पंकजांच्या नावावर मते घेऊन त्यांनी सभेला येऊ नये घरी जाऊन त्यांचे पाय धरले. उपकार विसरू नका, संघर्षासाठी रस्तावर आल्यास अगोदर आमच्याशी गाठ आहे.

सोमनाथ खेडकर म्हणाले, मुंडेंच्या विरोधात बोलण्याची तुमची उंची नाही. ग्रामपंचायत सदस्य म्हणुन तरी निवडुन येऊन दाखवा. मुंडे- ढाकणे संघर्ष गेल्या अनेक वर्षापासुन सर्वाना माहित आहे. या संघर्षात तुम्ही आज कोठे आहात ते पहा.ऊसतोडणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष कामगार कदापिही विसरू शकत नाहीत. मुंडेवर टीका करून आता मोठे होता येणार नाही. आरक्षणाचा मुद्यावरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न अंगलट येईल. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. आठवडे बाजारच्या दिवशी मुख्य चौकात आंदोलन झाल्याने रस्ताच्या दुतर्फा वाहनांची गर्दी झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)