सेतूकेंद्र चालकांकडून होणारी लूट थांबवावी 

मनसेकडून तहसीलदारांना निवेदन

पाथर्डी – सेतू केंद्र चालकाकडून विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ व परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार पाटील यांची भेट घेऊन सेतू केंद्र चालकांच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला.

यावेळी बोलताना जिरेसाळ म्हणाले की, शासनाने सेतू केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारचे दाखले, प्रतिज्ञापत्र, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अथवा शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे विविध दाखले, सात-बारा उतारे देण्याचा निर्णय घेतल्यानंतर जनतेची सुविधा होईल असे वाटत होते. मात्र सेतू केंद्रांच्या मनमानीपणामुळे सुविधा उपलब्ध होण्यापेक्षा अडवणूक जास्त होऊ लागली आहे. सेतू केंद्र म्हणजे लूटमार करण्याची अड्डे तयार झाले आहेत.

शहरात व तालुक्‍यात अनेक शासनमान्य सेतू केंद्र आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकाप्रमाणे फी आकारणी न करता कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावाखाली नागरिकांना लुटले जात आहे. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांची अक्षरशः तिप्पट दर आकारणी करुन लूट केली जात आहे. झटपट दाखला देण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. एखाद्या व्यक्तीने शासकीय फी व्यतिरिक्त पैसे देण्यास नकार दिल्यास वेगवेगळ्या त्रुटी काढून हेलपाटे मारावे लागतात. सेतू केंद्र म्हणजे

शासकीय नियंत्रणाखाली सर्वसामान्यांच्या खिशावर घातलेला दरोडा आहे. अशा प्रकारे तहसील कार्यालयाच्या आवारात व तालुका दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच सर्वसामान्यांना लुटले जात असताना महसुल प्रशासन फक्त बघ्याची भुमिका घेत मुक गिळुन गप्प आहे. सेतुकेंद्र चालकांच्या मनमानीला लवकरात लवकर वेसण घालुन त्यांना सरळ न केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

आंदोलकांचा रोष व सेतुकेंद्र चालकांच्या लुटमारीचा पुरावा दिल्यामुळे तहसीलदार नामदेव पाटील यांनी तातडीने मनसे पदाधिकारी व सेतुकेंद्र चालकांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण शिरसाट, मनसे जिल्हा उपाध्यक्ष रमेश चव्हाण, शहराध्यक्ष सुभाष घोरपडे, शहर सचिव संदीप काकडे, ओंकार पारखे, अशोक आंधळे, रंगनाथ वांढेकर, सचिन खेडकर, सुभाष नलवडे, प्रविण कचरे, ऋषीकेश हुलजुते, कैलास फुंदे, सुनिल मिरपगार आदिंसह मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)