पाथर्डी शहरात साहित्य मेजवानी

पाथर्डी – शहरात कृष्णा भोजनालय साहित्य मित्रमंडळातर्फे भगवान नगर येथील उद्यानात अठरावे दोन दिवसीय साहित्य संमेलन दि. 1 व 2 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. नामांकित साहित्यिकांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांनी भरलेले साहित्य संमेलन शहरवासीयांसाठी मेजवानी ठरणार आहे. मुख्य संयोजक अशोक व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. कृष्णा भोजनालय मित्रमंडळाचे अध्यक्ष शाहीर भारत गाडेकर व सचिव वसंत बोर्डे यांनी नियोजनाविषयी माहिती दिली. पाथर्डीचे भूमिपुत्र तथा नामांकीत विधीतज्ञ ऍड. भास्करराव आव्हाड यांचा अमृतमहोत्सवी गौरव समारंभ साहित्य संमेलनातील मुख्य आकर्षण आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डीचे सुपुत्र व तालुक्‍यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे जनक माजी मुख्य अभियंता सी.डी.फकीर राहणार आहेत. शनिवार दि. 1 डिसेंबर रोजी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवी चंद्रकांत कर्डक यांच्या हस्ते होणार असुन संमेलनाध्यक्ष डॉ रफिक शेख, स्वागताध्यक्ष रामकिसन शिरसाठ यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रमुख पाहुणे तहसीलदार नामदेव पाटील, कवी डॉ. कैलास दौंड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी कराड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात अनुराधा प्रकाशन शेवगाव या ग्रंथ दालनाचे उद्घाटन प्रा. मच्छिंद्र बाचकर यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मान्यवरांना पार्थ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. लालजी जोशी, मदन चन्ने, हरिहर गर्जे, भारत बांगर, लक्ष्मण खेडकर, मिनिनाथ शिंदे, नम्रता सातपुते, सुनिता फुंदे, हरिभाऊ फुंदे, रामनाथ शेळके,बाजीराव कुटे, संतोष दहिफळे, नवोदय ग्रामीण नागरी विकास संस्था तसेच ऐक्‍य पुरुष बचत गट यांचा पुरस्कारांमध्ये समावेश आहे. तिसऱ्या सत्रात श्री स्वामी समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

तर पहिल्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात पाहुण्यांशी रसिक वाचकांचा संवाद या सदराखाली हितगुज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव कैसे करणार आहेत. रविवार 2 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात योगशिक्षक भागवत खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी योगासन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानंतरच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. डी. फुंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक शहादेव काळे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी नाट्यवाचन, कविता गायन व कथाकथन कार्यक्रम आयोजित केला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष एम .डी फुंदे तर प्रमुख अतिथी भारत ढमाळ उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विठ्ठलराव आंधळे तर प्रमुख अतिथी प्रतापराव देशमुख आहेत.

सायंकाळच्या सत्रात खुले कविसंमेलन, विद्यार्थी संमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद काटे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य गोरक्षनाथ शिरसाठ उपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलनाच्या शेवटच्या गौरव समारंभ व समारोप समारंभाला पाथर्डीचे भूमिपुत्र ज्येष्ठ विधीतज्ञ ऍड.भास्कर आव्हाड यांचा अमृतमहोत्सवी गौरव समारंभ संपन्न होणार आहे.

जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती अर्जुनराव शिरसाठ यांचाही गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्य अभियंता सी.डी.फकीर भूषवणार आहेत. समारंभ सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील आडसकर फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. प्रमोद आडकर, कवी उद्धव कानडे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी कृष्णा भोजनालय साहित्य मंडळाचे भारत गाडेकर, वसंत बोर्डे,रवींद्र दारके, जगदीश गाडे,रवींद्र पाठक, बबनराव भगत, अंबादास साठे, प्रा.रमेश बाहेती, गणेश तुपे,भाऊसाहेब गोरे, रमेश वाधवने, प्रा.अशोक व्यवहारे, मेहरूनीसा पटेल, हुमायुन आतार, प्रा.अशोक व्यवहारे,महादेव कौसे आदी परिश्रम घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)