चैतन्य कानिफनाथ दिंडीचे रविवारी प्रस्थान

पाथर्डी – श्री क्षेत्र मढी येथून चैतन्य कानिफनाथांच्या दिंडीचे रविवारी ( दि.25) रोजी आंळदीकडे प्रस्थान होणार आहे. या पायी दिंडी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती दिंडी चालक बाबासाहेब मरकड व अंकुश मरकड यांनी दिली.

मढी ते आळंदी या मार्गावर प्रस्थानानंतर ठिकठिकाणी नाथ संप्रदयाप्रमाणे प्रबोधनपर भारुडे,प्रवचन, किर्तन असे कार्यक्रम होतील. पालखीचा पहिला मुक्काम मराठवाडी बारव येथे होऊन शिरूर, शिक्रापुर मार्गे दिंडी आळंदीकडे मार्गस्थ होईल.

भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंडी समितीकडून सेवासुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. या दिंडी सोहळ्यात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन मरकड यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)