तिसगाव येथे पैगंबर जयंती उत्साहात

पाथर्डी  – हजरत मोहम्मद पैगंबरांनी महिलांना आदराचे स्थान देत मुलींच्या जन्माला प्रोत्साहान देत जगाला दया करूणा सचोटी आणि इमानदारीने जीवन जगण्याचा संदेश दिला असे प्रतिपादन तिसगाव येथील जामा मस्जीदचे अध्यक्ष मन्सुरभाई पठाण यांनी केले.

तिसगाव येथे ईद मिलाद व हजरत पैगंबर यांच्या जयंतीनिमित बुधवारी सायंकाळी गावातून अतिशय शांततेत आणि शिस्तबध्द पध्दतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीची सुरुवात जामा मस्जिद पासून करण्यात आली. या मिरवणूकीमध्ये मौलाना जाकीर बरकाती, मौलाना शहाबुद्दीन, मौलाना ताजोद्‌दीन, अध्यक्ष मन्सुर पठाण यांच्यासह अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बसस्थानक परिसरापासून पुढे ठिकठिकाणी मिरवणूकीमध्ये सहभागी झालेल्या अबालवृध्दांसाठी चौकाचौकात फळ, मिठाई, दुधवाटपाचे नियोजन तरुणांकडून करण्यात आले होते.

-Ads-

यावेळी मौलाना जाकीर बरकाती म्हणाले, जगण्यासाठी आवश्‍यक बाबी कोणत्या हे समाजाला दाखवून दिले. सचोटी, दया, करूणा, इमानदारी या तत्वांचा पुरस्कार त्यांनी केला. वेळप्रसंगी धर्मयुद्धसुध्दा त्यांना करावे लागले जगाला शांती आणि समतेच संदेश त्यांनी दिला.

यावेळी उपसरपंच फिरोज पठाण, शिवनाथ आंधळे, युवा नेते वाहेद शेख, सिकंदर पठाण , पैलवान आरिफ तांबोळी, शिराज पठाण, शाकीर शेख, हमिद, राजेखॉं पटेल, पापाभाई तांबोळी, समिर बिल्डर, अकबर म्हैतब पठाण, चॉंद तांबोळी, फिरोज पठाण, अतिक शेख,कदिर पठाण, संजू नरवडे,वजीर शेख,रियाज शेख, शौकत पठाण, पंकज मगर, स्वप्नील लवांडे यांच्यासह अनेक तरुणांनी या मिरवणूकीमध्ये सहभाग घेतला .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)