स्पर्धेत टिकण्यासाठी क्षमता वाढवणे गरजेचे : डॉ. ढाकणे

पाथर्डी  – सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकानेच आपली क्षमता कशी वाढेल याकडे लक्ष द्यायला हवे, असे प्रतिपादन पाथर्डी तालुक्‍याचे रहिवासी व सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले.

येथील लायन्स क्‍लबच्या वतीने गरजू मुलांना बुट व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, डॉ. दीपक देशमुख, डॉ. सुनील बुधवंत, डॉ. भाऊसाहेब लांडे, डॉ. संदीप पवार, डॉ. हर्षल चितळे, राजेश काळे, भाऊसाहेब गोरे, राहुल मोरे उपस्थित होते.

-Ads-

ढाकणे म्हणाले, आपला तालुका हा दुष्काळी असला तरीही येथे बुद्धिवंतांची कमी नाही. तालुक्‍यातील कितीतरी अधिकारी आज प्रशाकीय सेवेत मोठ्या पदावर आपल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर काम करत आहेत. सध्याच्या युगात बळी तो कान पिळी अशी परिस्थिती असल्याने वंचित हा वंचितच राहत आहे.

ही परिस्थती बदलण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करायला हवे. आमच्या शालेय जीवनात देणारे हात कमी होते. सध्या अशी परिस्थिती नाही. गरजू विदयार्थ्यांना मदत करण्याचा चांगला उपक्रम लायन्स क्‍लबने राबवला असून त्याचे अनुकरण सर्वानी करावे असे ढाकणे म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)