पाथर्डी शहरात दोन दुचाक्‍या जाळल्या; एकावर गुन्हा

File Photo

पाथर्डी – शहरातील आनंदनगरमध्ये राहणाऱ्या पोपट नामदेव दहिफळे या प्राथमिक शिक्षकाच्या घरासमोरील लावलेल्या दोन दुचाक्‍या जाळल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली.याबाबत दहिफळे यांनी हर्षल बाबासाहेब बोरुडे (रा.बोरुडे मळा, पाथर्डी) याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील आनंदनगर या उपनगरात पोपट दहिफळे आपल्या परिवारासमवेत राहतात. दहिफळे हे शेवगाव तालुक्‍यात शिक्षक म्हणून काम करतात. आनंदनगर मधील घरासमोर संरक्षण भितीच्या आत त्यांच्या मालकीच्या दोन दुचाक्‍या नेहमीप्रमाणे लावलेल्या होत्या. शुक्रवार 5 ऑक्‍टोबर रोजी दहिफळे कुटुंब जेवण करून नेहमीप्रमाणे झोपले होते.

मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घराबाहेर जळाल्याचा वास आल्याने पती-पत्नी उठले व खिडकीतून बाहेर पाहिले.दोन्हीही दुचाकींना आग लागल्याचे त्यांनी पाहिले. शेजारीच हर्षल बाबासाहेब बोरुडे हा उभा असलेला त्यांनी पाहिला. त्यानंतर दहिफळे दांपत्याने घराबाहेर आले. तेव्हा बोरुडे तिथून पळून गेला. दोघांनीही मोटरसायकल विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या होत्या.याबाबत नामदेव दहिफळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हर्षल बाबासाहेब बोरुडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चव्हाण करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)