पाथर्डी येथे मुस्लीम बांधवांची ‘पावसा’साठी सामूहिक नमाज

प्रातिनिधीक छायाचित्र

भरपूर पाऊस पडावा, शेतकऱ्यासमारील संकटे दूर व्हावीत यासाठी मागितली दुवा 

पाथर्डी – तालुक्‍यात भरपूर पाऊस पडून शेतकऱ्यांसमोर असलेली संकटे दूर व्हावीत यासाठी तालुक्‍यातील मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून अल्लाहकडे दुवा मागितली. सामाजिक जाणीव ठेवून व राष्ट्रीय एकोपा राहावा, या उद्देशाने आयोजित केलेल्या सामूहिक नमाज कार्यक्रमाचे तालुक्‍यातून सर्वच जातीधर्माच्या लोकांकडून स्वागत होत आहे.

तालुक्‍यावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी खरिपाची पिके वाया गेली आहेत. जनावरांना चारा व पिण्याला पाणी नाही. पावसाळा संपत आला तरी पावसाचे चिन्ह दिसत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी व नागरिक चिंतातूर आहेत. परतीचा मान्सून जरी पडला तरी शेतकऱ्यांना थोडाफार आधार होऊ शकतो. तालुक्‍यातील मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन शहरातील मुख्य रस्त्याने शेवगाव रस्त्याकडे जाऊन मोकळ्या जागेत पावसासाठी एकत्रित नमाज पठण केले.

शेतीला उपयुक्‍त पाऊस पडू दे, पावसाअभावी जनतेसमोर असलेले संकट दुःख दूख होऊ दे, सर्वांच्या घरी सुख-शांती नांदू दे, सामाजिक सलोखा राहू दे, आम्हाला माफी दे, आम्हा सर्वांना सत्कार्य करण्याची बुद्धी दे, अशी अल्लाहकडे दुवा मागून याचना करण्यात आली. यावेळी मौलाना सैफुद्दीन, मौलाना शफिक, हाफिज युनूस, हाफिज अमिन, हाफिज लतीफ, मौलाना अहमद आदी धर्मगुरूंसह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)