वीजवाहिनी पडल्याने युवकाचा मृत्यू

महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पाथर्डी – वीजवाहक तार अंगावर पडून एका ऊसतोड युवकासह म्हशींचा मृत्यू झाला.तालुक्‍यातील लांडकवाडी येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वीज वितरण कंपनीची तारा तुटून सोन्याबापू अर्जुन कावळे (वय 22) हे घराच्या अंगणात बांधलेल्या म्हशीचे दूध काढताना हि दुर्दैवी घटना घडली.

वीजवाहक तारांमधून वीजप्रवाह वाहत असल्याने विजेचा जोरदार धक्का बसल्याने सोन्याबापू यांनी आरडा ओरडा केला. परंतु विजेचा जोरदार झटका बसल्याने सोन्याबापू तसेच म्हशीचा जागीच मृत्यू झाला. जवळ असलेले अर्जुन कावळे हे वाचवण्यास गेल्याने त्यांना सुद्धा विजेचा धक्का बसून किरकोळ दुखापत झाली. काय प्रकार झाला कोणाच्या लक्षात लवकर आला नाही सर्व ग्रामस्थ घटनास्थळाकडे पळू लागले मात्र तेथे वीजवाहक तार तुटली आहे. हे लक्षात आले त्यानंतर ग्रामस्थांनी वीजप्रवाह रोहित्रातून खंडित केला त्यानंतर वीज वाहक ताराच्या मधून सोन्याबापू व म्हशीची सुटका केली. परंतु तोपर्यंत दोघांचाही प्राण गेला होता.वीजवाहक तारा ह्या 1974 साली टाकलेल्या आहेत. त्या अद्याप बदललेल्या नाहीत. अखंड तारा नसून ठीक ठिकाणी जोडल्या आहे. त्या सैल पडल्या होत्या.

या भागासाठी गेल्या सहा महिन्यापासून वायरमन नाही.वीज समस्यांबाबत वेळो वेळी लेखी तक्रार वीज वितरण कार्यालयात केली गेली, मात्र कोणत्याच अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही, अशा प्रकारचा गावात तीन घटना घडल्या आहेत. त्यात शेतकऱ्यांची जनावरी मेली आहे. आज एक निष्पाप युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. याला वीज वितरण कंपनीचे संबंधित अधिकारी, कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाठ, पंचायत समितीचे सदस्य सुनील ओव्हळ, ग्रामस्थ रभाजी गर्जे, प्रकाश गर्जे, राजू गर्जे, भाऊसाहेब गर्जे, संदीप गर्जे, बाप्पू कावळे, देविदास आंधळे, नवनाथ जिवडे, मच्छिंद्र कावळे, नवनाथ गर्जे, नितीन कावळे, रामहरी जिवडे, सुदाम जिवडे यांनी केली आहे.

वीज वितरणचे कोणताही अधिकारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांचा रोष वाढला होता. जोपर्यंत हलगर्जी करणाऱ्या संबंधित वीज वितरणच्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही. तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पवित्र घेतला मात्र पोलीस निरीक्षक यांनी नातेवाईक आणि ग्रामस्थांची भेट घेऊन पोलीस प्रशासन कायदेशीर योग्य ते सहकार्य करेल, असे आश्‍वासन दिल्यानंतर अंत्यविधी शांततेत पार पडला. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस नाईक अनिल बडे हे तपास करत असून पोलीस कॉन्स्टेबल किशोर पालवे हे मदत करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)