पांढरीपुलावरील अपघातात पाथर्डीतील दोघा महिलांचा मृत्यू

दुभाजकावर वाहन आदळल्याने अपघात ; गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार

नगर – नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीपुलावर आज सकाळी दुभाजकावर आदळून पलटी झालेल्या चारचाकी वाहनातील पाथर्डीतील दोघा महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघ जण गंभीर जखमी झाले. उज्ज्वला अशोक गोरे (वय 45) व अनिता संजय गोरे (वय 35) असे ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. बाबासाहेब आबाजी गोरे, नीलेश पोपट गोरे, अशोक भिकाजी गोरे व संगीता विक्रम गोरे (सर्व रा. धारवाडी, ता. पाथर्डी) हे चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

-Ads-

पाथर्डीतील हे लोक कायगाव टोका दिशेने जाण्यासाठी नगर-औरंगाबाद महामार्गाने प्रवास करत होते. पांढरीपूल येथे सकाळी त्यांचे चारचाकी वाहन रस्त्यावरील दुभाजकावर आदळले. यानंतर या वाहनाने पलट्या घेतले. ही धडक मोठी होती. सिनेमातील अपघाताच्या दृश्‍यासारखी हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दुभाजकावर आदळून वाहन हवेत उडाले होते. त्यानंतर एकदम खाली पलटी होऊन पडले. हा प्रकार काही क्षणातच घडला.

वाहन खाली पडल्याचा परिसरात मोठा आवाज झाला. वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. वाहनाभोवती स्थानिकांनी गर्दी केल्यावर त्यातून रक्त बाहेर आले होते. काही जखमी किंचळत होते, तर काही सुन्न होऊन पडले होते. स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकांमधून जखमींना व ठार झालेल्या महिलांना जिल्हा रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचारानंतर जखमी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)