पाथर्डी – मिरी येथील कान्होबा देवस्थानसमोरील मोकळ्या जागेतील तुळशीच्या जागेवरून दोन समाजात तणाव निर्माण झाला होता. महसूल, पोलीस प्रशासनाने घेतलेल्या शांतता समितीच्या बैठकीत दोन्ही समाजाच्या वतीने सामजंस्याची भूमिका घेत हा वाद मिटविण्यात आला आहे.

मिरी येथे कान्होबा देवस्थानच्या समोर मोकळ्या जागेत तुळशीचे वृंदावन आहे. या जागेववरून दोन समाजात वाद निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री मिरी येथे तणावाचे वातावरण होते. जिल्हा पोलीस प्रमुखांनी मोठा पोलीस बंदोबस्त येथे तैनात केला होता.

प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पोलीस उप अधीक्षक मंदार जवळे, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या उपस्थितीत तहसीलदारांच्या दालनात बुधवारी मिरी येथील दोन्ही समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यामध्ये सोमनाथ झाडे, राहुल गवळी, अशोक शिंदे, नंदू बनकर, विजय गुंड, एकनाथ झाडे, पोपट गवळी, सादिक शेख, जाकीर पठाण, हसद इनामदार, महंमद सय्यद, अफसर सय्यद, सुभा पटेल, भैय्या शेख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)