पाथर्डी शहरात साडेतीन लाखांची चोरी

तालुक्‍यासह शहरात चोऱ्या घरफोड्या वाढल्या : पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जनता नाराज

पाथर्डी – पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहर व तालुक्‍यात चोऱ्या, दरोडे व अवैध व्यवसायांना चांगलाच उत आला आहे. शहरातील अत्यंत गजबजलेल्या नाथनगर उपनगरातील किराणा दुकानदार सुखदेव बडे यांच्या घरातील बंद खोलीचे कुलुप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा 3 लाख 60 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याबाबत सुखदेव हरिभाऊ बडे (रा. नाथनगर) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बडे कुटुंबीय जेवण झाल्यानंतर तळमजल्यावरील घरात झोपले होते. सकाळी आंघोळ केल्यानंतर कपडे घेण्यासाठी वरच्या खोलीत गेल्यावर चोरी झाल्याचे बडे यांच्या लक्षात आले. खोलीचा दरवाजा उघडा व कुलुप तोडलेले आढळले. खोलीत सर्वत्र उचकापाचक करून सामान, कपडे अस्तव्यस्त पडलेले दिसले. कपाटात ठेवलेले सोन्याच्या बांगड्या, गंठण, अंगठया, नथ, सोन्याचे मणी, नेकलेस, पुतळ्या, कर्णफुले, चांदीचे पैंजण यासह दीड हजार रुपये रोख तसेच बॅंकेचे पासबुक असे चोरून नेले.

सकाळी या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मोठी चोरी झाल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच तातडीने चक्र फिरवून नगर येथुन श्वानपथकास पाचारण करण्यात आले. श्वानाने बडे यांचे घर ते शेवगाव रस्तापर्यंत मार्ग दाखविला. त्यानंतर दुपारी ठसे तज्ञाला पाचारण करण्यात आले. त्यांनीही संबंधित ठिकाणचे ठसे घेतले आहेत. सकाळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मोठी या घटनेमुळे नाथनगर भागासह संपूर्ण पाथर्डी शहरात खळबळ उडाली असुन नागरिक भयभीत झाले आहेत.

गेल्या काही दिवसात शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गुन्हेगार राजरोसपणे फिरतांना दिसुन येतात.मात्र अजुन एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचे अस्तित्व मात्र कोठेही जाणवत नाही.

शहरात रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा करत गुंडप्रवृत्तीचे मुले गप्पा मारत रस्त्याने वावरणाऱ्या महिलांची छेडछाड करतात. दोन्ही बसस्थानकावर खिसेकापुंचा सुळसुळाट आहे. कधीच पुरेसा पोलीस बंदोबस्त नसतो. पोलीस अधिकारी व पोलीस नेमके कोठे असतात याचा थांगपत्ता गरजुंना लागत नाही.

याबाबत त्वरीत तपास न झाल्यास सर्वपक्षीय जनआंदोलन करून निष्क्रीय पोलीस अधिकारी व कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेबाबत पाथर्डी पोलिसांनी घरफोडी करून चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिनकर मुंडे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)