पतीचे छत्र हरपल्यानंतर महिलांच्या जीवनात संघर्ष

कविता आव्हाड : दीपावलीनिमित्त विधवा, वंचित महिलांना साडी,फराळाचे वाटप

पाथर्डी – पतीचे छत्र हरपल्यानंतर जीवनाशी संघर्ष करण्यात विधवा महिलांचे आयुष्य संपते. अशा लाखो महिलांना रोजीरोटीचे साधन उपलब्ध नसल्याने हलाखीचे जीवन जगत आहेत. समाजातील या वंचित घटकाचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मैत्रेय ग्रुप सदैव प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन ग्रुपच्या अध्यक्षा कविता अभय आव्हाड यांनी केले .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील विधवा व वंचित महिलांना अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान व मैत्रेय ग्रुप च्या वतीने दीपावलीनिमित्त साडी व फराळाचे वाटप करण्यात आले. शहरातील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आव्हाड बोलत होत्या. यावेळी शारदा बारवकर, लीलाबाई चिंतामणी, लक्ष्मी मेहेत्रे, मीरा पगारे उपस्थित होत्या.

आव्हाड म्हणाल्या की, दुष्काळ हा तालुक्‍याच्या पाचवीलाच पुजला आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊन विधवा व वंचित महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाढत्या महागाईची त्यात आणखी भर पडल्याने समाजातील हा महत्त्वाचा घटक हलाखीचे जीवन जगत आहे. कुटुंब प्रमुख हरपल्यानंतर परिवाराची जबाबदारी सांभाळताना करावी लागणारी कसरत व त्यातून होणाऱ्या वेदना शब्दात सांगता येत नाहीत.

मुलाबाळांचे शिक्षण व त्यांचे भविष्य घडवताना शासनाकडून किंवा सेवाभावी संस्थांकडून या घटकाला भरीव मदत मिळण्याची आवश्‍यकता आहे. यावेळी पाथर्डी शहरातील 45 विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा चेमटे यांनी केले. आशा पालवे यांनी सूत्रसंचालन केले तर शारदा बारवकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)