समन्वय नसल्याने पासपोर्ट मिळण्यास होते दिरंगाई

पोलीस ठाणे व पासपोर्ट कार्यालयाकडून हेळसांड

संगमनेर: पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी व संगमनेर शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने नागरिकांना पासपोर्ट मिळण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पोलीस तपासणीबाबत नेमकी कुणाकडे चौकशी करायची, याबाबत स्पष्टतान नसल्याने नागरिकांत संभ्रम आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर पासपोर्ट कार्यालयात दाखल होणाऱ्या प्रकरणात पोलिस तपासणीस होणारी दिरंगाई हा सर्वाधिक कटकटीचा विषय आहे. पासपोर्टचे प्रकरण दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात तपासणीसाठी ते पाठविण्यात येते. मात्र संबंधित पोलिस ठाण्यातील संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला वेळ असेल, तरच तपासणी वेळेत होते. अन्यथा तुमचे तपासणीचे प्रकरण अद्याप आमच्यापर्यंत आलेलेच नाही, असे उत्तर देण्यात येते.

एकीकडे पासपोर्टच्या संकेतस्थळावर पोलीस ठाण्यात तपासणीसाठी प्रकरण पाठविल्याचे दिसत असते, तर दुसरीकडे पोलीस प्रकरण आमच्यापर्यंत आलेलेच नाही, असे उत्तर देतात. अशा वेळेस चौकशी केली, तरी लोकांचा फुटबॉलच होतो. पासपोर्ट कार्यालयात चौकशी केल्यास तुमचे प्रकरण तपासणीसाठी पोलीस ठाण्याकडे पाठविले आहे, असे सांगीतले जाते, तर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता, तुमचे प्रकरण आलेच नाही, असे सांगण्यात येते.

अनेकदा नागरिकांना लवकर पासपोर्ट हवा असतो. पण कामातील दिरंगाईने ते मेटाकुटीला येतात. पोलिसांच्या वेळेनुसार व सवडीनुसार तपासणीचे काम केले जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. अनेकदा महत्त्वाची कामे टाकून लोक तपासणीसाठी येतात. पण कधी कर्मचारी असेल, तर अधिकारी नसतात. त्यामुळे नागरिकांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागते.

सध्या ऑनलाईनचा जमाना असतानाही त्याचा वापर पोलीस दल का करत नाही, हा प्रश्‍नही अनुत्तरीतच आहे. पासपोर्ट कार्यालय व पोलीस ठाण्यांत समन्वय राहिल्यास नागरिकांची गैरसोय टळेल. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)