पारनेरमध्ये अवैध दारू पकडली,पिस्तूल बाळगणारा सापडला

File Photo

पारनेर : सांगवी सूर्या गावातील रानवारा हॉटेलवरील अवैध दारू विक्रीवर छापा घालताना पारनेर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्याला अटक केली. सुधीर जगन्नाथ कोठावळे असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहे.

हॉटेलमधून सुमारे 40 हजार रुपयांदा अवैध देशी-विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे व राज्या उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी सांगवी सूर्या येथील रानवारा हॉटेलवर छापा घातला. या पथकाला हॉटेल परिसरात सुधीर कोठावले हा संशियतरित्या फिरत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याच्याकडे चौकशी केल्यावर गावठी पिस्तूल आणि काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदव्लिा आहे. पोलीस कर्मचारी महेश आव्हाड, अरविंद भिंगारदिवे, शैलेश रोहकले, शिवाजी कवडे, अण्णा चव्हाण हे या कारवाईत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)