बिबट्याच्या हल्यात चिमकुली जागीच ठार

संग्रहित छायाचित्र

पारनेर – जनावरांच्या वाड्यावर कामात व्यस्त असलेल्या एका चिमुकलीवर भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने हल्ला केल्याने ही चिमुकली जागीच ठार झाली. तालुक्‍यातील शिरापूर येथे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. सानिका पावसा बरकडे असे या चिमुकलीचे नाव असून, या घटनेने पारनेर तालुक्‍यात भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत माहिती अशी, सायंकाळी शिरापूर (नरसाळेवाडी) मायनर क्र 17 येथे 5 वीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी सानिका ही आपल्या वाड्यावर वाडा लावण्यात मग्न असताना भक्ष्याच्या शोधात असलेल्या एका बिबट्याने हल्ला केला. शेजारील ऊसाच्या शेतात तिला ओढत नेले. या हल्ल्‌यात ही चिमुकली जागीच ठार झाली. या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत तीची प्राणज्योत मालवली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पारनेर तालुक्‍यातील निघोज, वडनेर, शिरापूर, चोंभूत व अळकुटी परीसरात गेल्या दोन तीन महीन्यापासून बिबट्याचे वास्तव्य आहे. शेतीचे कामे करत असताना अनेकांच्या नजरेस पडला. यानंतर या परीसरातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली. बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनीही पिजंरा लावण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. मात्र वनविभागाच्या आधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

पारनेर तालुक्‍यात सध्या शेतीपिकाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु असताना विजेच्या भारनियमामुळे रात्रीच्या अंधारातही शेतकऱ्यांना पाणी भरणी करावी लागते. मात्र बिबट्याचे वास्तव्य असल्याने येथील शेतकरी भयभीत झाले, असताना वन विभागाकडून मात्र दुर्लक्ष होत असल्याने जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परीसरात तातडीने पिंजरा लावावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे व शिरापूर ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)