धुक्‍यात हरवला कोरठणचा गड

पिंपळगाव रोठा येथील कोरठण गड धुक्‍यात हरवला आहे. त्यामुळे तो अधिक मनमोहक दिसतो.

नगर – पारनेर तालुक्‍यातील पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थाननजीकचा कोरठण गड धुक्‍यात हरवला आहे. माळशेज घाटासारखे वातावरण इथे सध्या अनुभवायला मिळते आहे. दिवसभरात तीन-चार वेळा तसेच सकाळी हा धुक्‍याचा नजारा पाहायला मिळतो. त्यामुळे मंदिर परिसरात व मंदिराखाली असलेल्या गारखिंडी घाटात पर्यटकांची गर्दी होत आहे. सध्या जिल्ह्यात पाऊस नसला, तरी कोरठण गड परिसरात पावसाची भुरभूर सुरू आहे.

वाटाण्याचे पिकाचे आगर असलेल्या या परिसरातील वातावरण व माळशेज घाटातील वातावरण सारखेच असते. माळशेज घाटात धबधबे व धुके असतात. कोरठण गड येथे फक्त धुके व भुरभूर पाऊस असतो. पहाटे पासून धुक्‍याची चादर ओढावी तसे रस्ते, डोंगर, गावे, मंदिर परिसर दिसत नसल्याने ते हरवली की काय असे धुक्‍यामुळे वाटते. सगळीकडे मोठ्या प्रमाणात धुके आल्याने काही अंतरावरचेदेखील दिसत नसल्यानं वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी वेगमर्यादा प्रमाणात ठेवावी लागली. वाहनांच्या लाईट लावत हळूहळू वाहने चालवावी लागतात.

धुक्‍यातील दव त्यांना भेदून पुढं जातात. या ठिकाणहून गारखिंडी घाट व जंगल आहे. सध्या सर्व परिसर हिरवागार झाला असून येथे राहण्यासाठी भक्त निवास आहे. धार्मिक बरोबरच पर्यटनस्थळ म्हणून हे क्षेत्र विकसित होत आहे. धुक्‍यांनी मंदिर परिसर दिसत नाही. उंच डोंगरावर असलेले हे मंदिर धुक्‍यात गेले, की आपण किती उंच ठिकाणी आहोत हे जाणवते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)