अखेर ‘पैठण-राहुरी’ बससेवा सुरू

File photo

सोनई – अनेक दिवसापांसून प्रलंबित असलेल्या प्रवाशांच्या मागणीला यश येऊन पैठण-राहुरी ही बससेवा गुरूवारपासून सुरू झाली, त्यामुळे एसटी महामंडळाचे व पैठण आगारच्या बसचे स्वागत करण्यात आले.

ही बस सोनईमध्ये येताच त्याचे स्वागत पत्रकार व प्रवाशांतर्फे बस स्थानकात विजय खंडागळे यांनी चालक, वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.ही बस पैठण आगारातून सायंकाळी 5 वा. सुटून शेवगाव, कुकणे, चांदे, घोडेगाव, शनिशिंगणापूर, सोनई, ब्राम्हणी, मार्गे येऊन राहुरी येथे रात्री 8.30 वा. मुक्कामी येते. दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वा. सुटून याच मार्गे पैठणला सकाळी 9.30 वा. पोहचते.

यावेळी अशोक क्षीरसागर, शुभम चामुंटे, ताराचंद फोलाने, शरद गडाख, लक्ष्मण गोसावी, अर्जुन औटी, के.पी. शिंदे, दत्तात्रय वैरागर, रामेश्वर दरंदले, शिवाजी भिगारे, चालक यू.पी. पवार, वाहक एस.पी.कुंदलवाल आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)