नगर – महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या संगमनेर शाखेतर्फे विविध मागण्यांसाठी मुंबई येथे पेन्शन दिंडी आणि सामूहिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे. संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. तहसीलदार सोनवणे यांनी पदाधिकाऱ्यांशी यावेळी सकारात्मक चर्चा केली.

सरचिटणीस नीलेश हारदे, उपाध्यक्ष खंडू कोळपे, कोषाध्यक्ष संतोष झावरे, प्रसिद्धिप्रमुख विकास खेबडे, जिल्हा प्रतिनिधी नितीन केंगार, बन्सी मेहेर, मनीषा दातीर, कल्याणी साठे, माधुरी मंडलिक, ज्योती कदम आदी यावेळी उपस्थित होते.

पेन्शनची लढाई अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे पेन्शचे महत्त्व जाणून या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शैलेश खणकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)