सावता परिषदेचे राज्यभर आंदोलन : ओबीसी महामंडळाला 500 कोटींची तरतूद करावी
नगर – क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे स्मारक व ओबीसी आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी सावता परिषदेने बुधवारी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शने करण्यात आली आहे. नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रदेश महासचिव मयुर वैद्य यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
समाजक्रांतीचे अग्रदूत क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे. मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवावे. जातीनिहाय जनगणना करुन आकडेवारी जाहीर करावी. महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करावा. महिला व बहुजन शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा जोतिबा फुले यांची जयंती शिक्षक दिन म्हणून पाळण्यात यावी. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव नायगांव (जि. सातारा) येथे सावित्रीसृष्टी निर्माण करावी. तसेच मुलींची पहिली शाळा सुरू झालेल्या पुणे येथील भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे.
ओबीसी मंत्रालयामार्फत ओबीसी शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासाठी योजना तयार करुन त्याची अंमलबजावणी करावी. ओबीसी वित्त व विकास महामंडळाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 500 कोटींची भरीव आर्थिक तरतूद तात्काळ करावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची व्यवसाय अभ्यासक्रमाची बंद करण्यात आलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी. स्थगित करण्यात आलेली मेगा नोकर भरती तातडीने करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यापूर्वी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदशने केली.
जिल्हाध्यक्ष निखिल शेलार, उपाध्यक्ष गणेश बनकर, कार्याध्यक्ष सावता हिरवे, संपर्कप्रमुख राहुल वैद्य, तालुकाध्यक्ष महादेव खंदारे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुसे, चरणसिंग परदेशी, नितीन डागवाले, अमोल नांगरे आदि उपस्थित होते.गणेश फुलसौंदर, प्रवीण जाधव, सुनील गायकवाड, अभिषेक पडोळे, रोहित सुरतवाले, सचिन नांगरे, संतोष पुंड, ऋषीकेश रासकर, खंडू मेहेर, प्रमोद पुंड, प्रकाश मेहेर, संदेश पानसरे, राजू नगरे, गणेश माळी, नवनाथ खामकर, सागर उबाळे, शुभम हजारे, अभिषेक कोथिंबीरे, सागर चौरे, बदामराव पंडित आदिंसह सावता परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा