निमगाव वाघा येथे गणेशोत्सवात आरतीचा पहिला मान महिलांना

नगर – नगर तालुक्‍यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने उत्साहात श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. गणेश स्थापनेनंतर आरतीचा पहिला मान गावातील महिलांना देण्यात आला. तसेच गणेशोत्सवा निमित्त गावात विविध सामाजिक व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डोंगरेवस्ती येथे झालेल्या श्री गणेशाची स्थापना युवा मंडळाच्या सचिव तथा राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे यांच्या हस्ते झाली. यावेळी डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, प्रियंका डोंगरे, अलका निमसे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, राधिका डोंगरे, संतोष फलके, मनिषा खळदकर, संगीता डोंगरे, कांचन डोंगरे, किरण निमसे, रघुनाथ डोंगरे, पै.स्वराज डोंगरे आदि उपस्थित होते.

या गणेशोत्सवात संस्थेच्या वतीने जनजागृतीवर विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये शाहीरी जलसा कार्यक्रम रंगणार आहे. शाहीर या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्री जन्माचे स्वागत, स्त्री सक्षमीकरण, व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. युवकांसाठी मतदार जागृती, व्याख्यान, स्वच्छता अभियान व वृक्षरोपण अभियान राबवून, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाणार असल्याची माहिती पै.नाना डोंगरे यांनी दिली. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी व क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)