निळवंडेच्या कालव्यांसाठी मिळालेल्या 500 कोटींना राज्यपालांची मान्यता

संग्रहित छायाचित्र..

सामंजस्य करारानंतर होणार निधीची उपलब्धता !

शिर्डी – जिरायती भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी शिर्डी साईबाबा संस्थानकडून मिळणाऱ्या 500 कोटी निधीला राज्यपालांनी हिरवा कंदील दाखविला आहे. शिर्डी संस्थान आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात होणाऱ्या सामंजस्य करारानंतर हा निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल.

निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी शिर्डी संस्थानने 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतू त्याला राज्यपालांची मान्यता मिळाली नव्हती. त्यामुळे कालवे उभारणीचे काम ठप्प झाले होते. अखेर आज राज्यपालांनी त्याला मान्यता दिल्यानंतर निळवंडे धरणाच्या कालव्याचा विषय मार्गी लागणार आहे. या प्रस्तावाला राज्यपालांनी काही अटीवर मान्यता दिली आहे. या निधीसाठी शिर्डी संस्थान आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाने विधी व न्याय विभागाचे मार्गदर्शन घेवून सामंजस्य करार करण्यास राज्यपालांनी सूचित केले आहे.

त्यानुसार राज्यपालांनी सूचित केल्याप्रमाणे अटींना अधिन राहून शिर्डी संस्थान यांच्यासोबत निळवंडे कालव्यांसाठी 500 कोटींचा निधी मिळण्याबाबतचा सामंजस्य करार करण्याची कार्यवाही नियामक मंडळाच्या मान्यतेने महामंडळाच्या स्तरावरून करण्याबाबत शासनाचे उपसचिव सं. रा. तिरमनवार यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)