न्यायाच्या मागणीसाठी निघोजमध्ये मुकमोर्चा

राळेगण थेरपाळ:  येथील मुलीच्या कुटूंबांना व राळेगण थेरपाळ ग्रामवासीयांना न्याय मिळावा यासाठी निघोज येथे मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

निघोज – राळेगण थेरपाळ येथील मुलीला व कुटुंबाला तसेच राळेगण थेरपाळ येथील ग्रामवासीयांना न्याय मिळावा या मागणीसाठी निघोज येथे शनिवारी मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निघोज ग्रामपंचायत, निघोज ग्रामस्थ, मुलिकादेवी माध्यमिक विद्यालय, शिवबा संघटना, संदीप पाटील फाऊंडेशन, अल्पसंख्याक समाज मंडळ, पारनेर व निघोज परिसर पत्रकार संघ, विविध सहकारी संस्था, विविध सेवाभावी संस्था आदी ग्रामस्थ, तसेच विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते. मोर्चानंतर पोलीस दूरक्षेत्र पोलीस कर्मचारी यांना मोर्चाच्यावतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, राळेगण थेरपाळ येथील दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत. गेली आठ दिवसात अत्याचाराच्या दोन घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, तालुक्‍यात घबराट पसरली आहे. अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून माणवतेची भावना नष्ट करण्याचे काम केली आहे. अशा क्रुर कर्माला फाशीशिवाय दूसरी शिक्षाचा नाही. तसेच लगेच सहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करुन तिचा निर्घृण खून करुन तीला विहीरीत टाकण्यात आले.

ही घटनादेखील अमानवी असून, या दोन्ही घटनेचा तीव्र शब्दात निषेध करावा तेवढाच कमी आहे. यातील दोन्ही घटनांच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांबरोबरच मुलिकादेवी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनींनीदेखील संतप्त भावना व्यक्त करीत, या घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

राळेगण थेरपाळ गावचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे गुन्हेगार बाहेरचे आहेत, यासाठी बाहेरील लोकांची गुन्हेगारी पाश्वभूमी तपासून पोलिसांनी त्यांना गावात प्रवेश दिला पाहिजे. तसेच राळेगण थेरपाळ हे गाव बागायत पट्टा आहे. आर्थिकदृष्ट्‌या समृद्ध असणाऱ्या या गावात पोलीस दूरक्षेत्र असण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)