संगणकीकरणामुळे दोन कोटी वाचले

अन्नधान्य, रॉकेल वितरणाचा पारदर्शक परिणाम

नगर – सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शक आणि ई-पॉस मशीनद्वारे शिधापत्रिकांवर अन्नधान्य वितरणामुळे गरजू आणि योग्य लाभार्थींपर्यंत ते पोहचले आहे. या संगणकीकरणामुळे जिल्ह्यातील अन्नधान्याची मागणी दरमहा तब्बल 7 हजार 500 मेट्रीक टन कमी झाली असून शासनाची तब्बल 1 कोटी 83 लाख 97 हजार रुपयांची बचत झाली असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात ना. शिंदे यांनी आज सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समितीची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पुरवठा अधिकारी वाघ, सहायक पुरवठा अधिकारी जितेंद्र इंगळे यांच्यासह अशासकीय सदस्यांची उपस्थिती होती.

ना. शिंदे यांनी जिल्ह्यातील शिधापत्रिकेद्वारे वितरित होणाऱ्या अन्नधान्य आणि रॉकेल वाटपाचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी रॉकेल तसेच स्वस्त धान्य दुकाने बंद आहेत. त्याठिकाणी नव्याने जाहीरनामे काढावेत, ही प्रक्रिया आठ दिवसात पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी पुरवठा विभागाला दिले. राज्य शासनाने एप्रिल 2018 पासून एपीडीएस अंतर्गत ई-पॉस मशीनद्वारे शिधापत्रिकांवर अन्नधान्य वितरणास सुरुवात केली आहे.

त्यामुळे गरजू आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत ते वितरित करण्यात येत आहे. ई-पॉस मशीनचा अवलंब करण्यापूर्वी जिल्ह्याची अन्नधान्याची मागणी ही दरमहा 17 हजार 500 मेट्रिक टन इतकी होती. आता ऑगस्ट 2018 मध्ये ही मागणी केवळ 10 हजार मेट्रीक टनावर आली आहे. त्यामुळे शासनाचे साधारण 7 हजार 500 मेट्रीक टन धान्य कमी झाले असून ते इतरत्र योग्य लाभार्थ्यांपर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अन्नधान्य वितरणात पारदर्शकता येण्याबरोबरच रॉकेल वितरणातही पारदर्शकता आल्याने त्याची मागणीही घटली आहे. जिल्ह्यात उज्ज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे काही गावांनी आता रॉकेल नको असे सांगून रॉकेलमुुक्‍त गावाकडे वाटचाल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचे मार्च 2018 साठी मंजूर असणारे रॉकेलचे नियतन हे 3 हजार 120 किलोलीटर (260 टॅंकर) असे होते. मात्र ऑगस्ट महिन्यात त्याची मागणी केवळ 780 के. एल. (65 टॅंकर) एवढी घटली आहे. तब्बल 195 टॅंकर केरोसीनची मागणी कमी होणे, हे पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराचे उदाहरण असल्याचे ना. शिंदे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)