बेलपारा प्रकल्पातील अनधिकृत पाणीउपसा बंद करावा

पाथर्डी – तालुक्‍यातील वडगाव येथे असलेल्या बेलपारा तलावातील पाणी शेतकऱ्यांनी उपसले असून आता तलावाच्या लाभक्षेत्रात काही शेतकऱ्यांनी अनधिकृत विहिरी खोदत या विहिरीतील पाण्याचासुद्धा उपसा सुरु केल्याने गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार नसल्याने हा उपसा तकाळ बंद करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे येथील ग्रामस्थांनी केली आहे.

बेलपारा तलाव तालुक्‍यात मोठा तलाव असून मागील वर्षी झालेल्या पावसाने या तलावात चांगला पाणीसाठा जमा झाला होता, मात्र तलावाच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांनी या तलावात वीजपंप टाकून तलावातील सर्व पाणीसाठा उपसला आहे. याशिवाय तलावाच्या लगत काही शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या असून त्यातून सध्या पाणी उपसले जात असल्याने वडगाव गावात भविष्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे हा पाणी उपसा तातडीने थांबवून संबंधित शेतकऱ्यांवर भूजल प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर उपसरपंच रावसाहेब ढाकणे, माजी सरपंच आदिनाथ बडे, रामाहरी गीते, बबन ढाकणे, म्हतारदेव ढाकणे, रवींद्र ढाकणे, लक्ष्मण ढाकणे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)