यापुढील प्रत्येक कार्यक्रमात मनुस्मृती जाळणार : भुजबळ

ससाणे यांनी विकास केला

दिवंगत ससाणे यांच्याशी आपला कौटुंबिक स्नेह होता. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा समान धागा आमच्यात होता. पंकज भुजबळ यांच्या निवडणुकीत ससाणे यांनी मदत केली. कॉंग्रेसच्या आमदारांचा त्यांनी पाठिंबा मिळविला होता. दिल्लीत अनेक खात्याच्या सचिवांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्या माध्यमातून मोठी कामे करून दिली. ससाणे यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी करण यांना ताकद देऊ, अशी ग्वाही भुजबळ यांनी ससाणे समर्थकांच्या उपस्थितीत दिली.

श्रीरामपूर – समता परिषदेच्या यापुढील सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात मनुस्मृती जाळणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या अपप्रवृत्तींवर गुन्हा दाखल होत नाही. मात्र, मनुस्मृती जाळल्यास गुन्हे दाखल होतात, अशी टीका त्यांनी केली.

श्रीरामपूर येथे बुधवारी जयंत ससाणे यांच्या निधनानंतर ससाणे कुटुंबीयांच्या निवासस्थानी सांत्वनाकरिता ते आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची लोकसभेच्या जागावाटपासाठी बैठका होत आहेत. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 17 जागांवर एकमत झाले आहे. 14 जागांमध्ये मित्रपक्षांना सामावून घेतले जाईल. काही जागांबाबत बोलणी सुरू आहे. समता परिषदेच्या कामांना गती देण्यात आली आहे. 2 नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेत आहोत. हजारीबाग, रांची येथे मेळावे घेणार आहोत. डावे पक्षदेखील सोबत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढील काळात युवकांना परिषदेत सामावून घेऊ. राज्य सरकारने मराठा व धनगर प्रश्‍नावर केवळ गाजर दाखविले.
नगर-नाशिक व मराठवाड्याच्या पाणी संघर्षावर भुबजळ यांनी भाष्य केले. या कायद्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय त्याची दुरूस्ती करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, नगर दक्षिणेची जागा युवा नेते डॉ. सुजय विखे यांना सोडण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न करावेत, अशी मागणी करण ससाणे यांनी भुजबळ यांच्याकडे केली.

सभापती सचिन गुजर, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, मुळा-प्रवराचे उपाध्यक्ष जी.के.पाटील, संजय फंड, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, माजी सभापती नानासाहेब पवार, आशिष धनवटे, माजी जि.प.सदस्य बाबासाहेब दिघे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ फंड, नानासाहेब शिंदे, सुनील कुदळे आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)