दुष्काळसदृश तालुक्‍यात महसूल सवलतीसह परीक्षा शुल्कात माफी

नगर – जिल्हयातील 11 तालुक्‍यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सरकारने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्याची कडेकोड अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जिल्हयातील जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव आणि श्रीगोंदा या तालुक्‍यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

या तालुक्‍यातील जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सवलत, शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्‍यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी सवलती दिल्या गेल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)