मका उत्पादक शेतकरी अडचणीत

File Photo

व्यापाऱ्यांकडून कमी भावाने मका खरेदी सुरू

केंद्र सरकारचा हमीभाव नावापुरताच..!

केंद्र सरकारने अनेक पिकांचा हमीभाव जाहीर केला आहे. मका पिकासाठी प्रतिक्विंटल 1700 रुपये आधारभूत किंमत जाहीर केली आहे. प्रत्यक्षात श्रीगोंद्यात मात्र आधारभूत किमतीपेक्षा कमी किंमतीने मका खरेदी केली जात आहे. उत्पादन खर्च निघून शेतकऱ्यांना चारपैसे मिळतील अशी स्थिती दिसत नाही. त्यामुळे सरकारने जाहीर केलेला हमीभाव केवळ नावापुरताच उरला असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

श्रीगोंदे – यंदा तालुक्‍यात जेमतेम पाऊस झाला. परिणामी बहुतांश शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या मक्‍याकडे वळाले. मका पिकासाठी शासनाने 1700 रूपये हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात मका बाजारात येऊन आता शासनाने जाहीर केलेला हमीभावदेखील मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. व्यापारी देतील त्या भावाला मका विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

-Ads-

तालुक्‍याकडे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी मका पिकाला प्राधान्य दिले. मका पिकासाठी शासनाने प्रतिक्विंटल 1700 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. आता नव्याने उत्पादित केलेली मका बाजारात येत आहे. व्यापारी मात्र शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 1200 ते 1400 रुपये भाव देत आहेत. दोन वर्षांपूर्वी मक्‍याचे दर घसरल्याने शासनाने आधारभूत किंमत जाहीर करून, मका खरेदी केंद्र सुरू केले होते. श्रीगोंद्यात मात्र अद्याप शासनाचे मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही.

श्रीगोंदे बाजार समितीमध्ये हमीभावपेक्षा कमी दराने मका खरेदी केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचादेखील मिळेल त्या दराने मका विकण्याकडे कल आहे. श्रीगोंद्यातील मका खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीला मुकावे लागत आहे. काही व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन मका खरेदी करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)