‘ज्ञानेश्वर’ च्या व्यवस्थापनाची चौकशी करा

भाजप जिल्हा उपाध्यक्ष अंकुश काळे यांची मागणी

गोपाळपूर – श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाकडून ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश काळे यांनी राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडू यांच्या कडे निवेदनाद्वारे केली.

-Ads-

निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक हंगामी कामगारांना डावलून नवीन नोकर भरती केलेल्या कामगारांना ताबडतोब कायम करणे, नवीन सभासद व कामगार भरतीमध्ये फक्त ठराविक गावांना प्राधान्य दिले जावे, सेवा निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांना वारंवार मुदतवाढ देणे, ऊस उत्पादकांना जाहीर केल्याप्रमाणे प्रतिटन 2500 रूपये भाव न देता कमी भाव देणे, या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अंकुश काळे यांनी केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)