मुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन

चौथ्या दिवशीही सातवडच्या ग्रामस्थांतर्फे पाण्यासाठी आंदोलन सुरूच

पाथर्डी – नगर, राहुरी तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधींनी विधायक कामाकडे लक्ष देण्याची गरज असून, वांबोरी चारीसारखी महत्त्वाकांक्षी योजना केवळ प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे चालवण्यात अपयश आले असल्याची टीका युवा नेते प्राजक्त तनपुरे यांनी केली.

सातवड (ता. पाथर्डी) येथे वांबोरी चारीच्या पाण्यावरुन सुरू असलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले तनपुरे यांनी आंदोलकांशी संवाद साधताना आ. शिवाजी कर्डिले यांच्यावर टीका करत योजनेच्या पाण्याचे वीजबिल सरकारने भरले असते. परंतु ते सरकारपुढे मांडण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले नाही.

उजव्या कालव्याला सोडण्यात येणारे आवर्तन आणखी काही दिवस थांबवले, तर वांबोरी चारीचा फुटबॉल उघडा पडणार नाही आणि आणखी आठ दहा दिवस पाणी मिळेल. आवर्तन लांबवण्यासाठी हायकोर्टात जाण्याचा इशारा माजी सभापती संभाजी पालवे यांनी दिला. यावेळी उपसरपंच राजेंद्र पाठक, विनायक पाठक, उद्धव पाठक, अमोल पाठक आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)