लकी ड्रॉच्या नावाखाली हिंगणगावच्या एकाची फसवणूक

नगर – हिंगणगावमधील (ता. नगर) नोकरदाराची लकी ड्रॉच्या नावाखाली सुमारे 35 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राजेश जयवंत सोनवणे (वय 50, रा. हिंगणगाव, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

त्रिमूर्ती सेल्स ऍण्ड मार्केटिंग बिजनेस प्रायव्हेट लिमिटेडमधून आलो असल्याचे सांगून या दोघांनी राजेश सोनवणे यांना लकी ड्रॉ स्क्रॉचमध्ये मोटारगाडी लागल्याचे सांगितले. ही मोटारगाडी घेऊन देण्यासाठी राजेश यांना 35 हजार रुपये भरण्यास सांगितले. या दोघांनी राजेश यांचा विश्‍वास संपादन केला.

-Ads-

या दोघांवर विश्‍वास ठेवून त्यांनी 35 हजार रुपये रोख दिले. परंतु कोणत्याही प्रकाराचा परतावा मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर राजेश यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. राजेश यांनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)