बुऱ्हाणनगरला देवी मंदिरात चोरी

चांदीचा मुकूट, छत्री, सिंहाच्या प्रतिकृतीसह दानपेटी फोडून 4 लाख लंपास

आगडगावनंतर बुऱ्हाणनगरमध्ये चोरी

आगडगाव (ता. नगर) येथे जागृत देवस्थान असलेल्या भैरवनाथ मंदिरात अशाच प्रकारे चोरी झाली होती. तेथील मंदिरातील चोरी करणारे अन्‌ येथील बुऱ्हाणनगर येथील देवीच्या मंदिरातील चोरी करणारे चोरांमध्ये साम्य असल्याचे सीसीटीव्हीतील चित्रीकरणात दिसते आहे. सीसीटीव्हीतील चित्रीकरणामुळे चोरटे लवकरच जेरबंद होतील, असा विश्‍वास भिंगार कॅम्प पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नगर – राज्य आणि जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील तुळजाभवानी मंदिरात आज शनिवारी पहाटेच्या सुमारास चोरी झाली.

चोरांनी मुख्य दरवाजाचे कुलूप व जाळ्या कटरने कापून मंदिरात प्रवेश करून देवीचा मुकूट, छत्री, सिंह अशा चांदीचे दागिने अन्‌ दानपेटीतील रोख रकमेसह 4 लाखाचा ऐवज चोरून नेला. बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथे देवी मंदिरात प्रथमच अशी घटना घडली.

चोरांनी मध्यरात्री देवीच्या मंदिराचा मुख्य दरवाजा कुलूप व जाळ्या कटरने कापून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकूट, छत्री, सिंह असे साडेतीन लाखाचे दागिने चोरून दान पेटीतील रोकड असा चार लाखाचा ऐवज लंपास केल्याची माहिती मंदिराचे पुजारी ऍड. विजय भगत यांनी दिली. भगत मंदिरात आल्यानंतर त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनीच भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली.

भिंगार कॅम्प पोलिसांसमोर आव्हान

बुऱ्हाणनगरमधील देवीचे मंदिर पूर्णपणे बंदिस्त आहे. त्यामुळे आसपासच्या लोकांना मंदिरात काय चाललंय हे कळत नाही. मंदिराच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी सुरक्षेची व्यवस्था तोकडी आहे. मंदिरात प्रथमच चोरी झाली आहे. त्यामुळे चोरांचा शोध घेण्याचे आव्हान भिंगार कॅम्प पोलिसांसमोर आहे.

पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी तातडीने मंदिराला भेट देत पहाणी केली. तेथील सीसीटीव्हीतील चित्रीकरण तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्‍वान पथकाच्या मदतीने तपासाच्या पोलीस अधीक्षकांनी सूचना केल्या आहेत. विजय भगत यांनी यासंदर्भात भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)