अन्यथा ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पाडणार

महाराष्ट्रीय अपंग विकास मंचाचा इशारा : शेष निधी दिव्यांगांच्या खात्यात वळता करा 

नगर  – जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायत स्तरावर स्वनिधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा 3टक्के निधी दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट वळता करावा, असा निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. मात्र, या निर्देशानुसार जिल्हयात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तरी हा निधी वळता करावा, अशी मागणी महाराष्ट्रीयन अपंग विकास मंचाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्याकडे मंचाचे अध्यक्ष वसंत शिंदे यांनी केली आहे. यावेळी शेंडी ग्रामपंचायत सदस्य अविनाश शिंदे, अमोल कराळे उपस्थित होते.

-Ads-

28 ऑक्‍टोबर 2015च्या शासन निर्णयाद्वारे सर्व जिल्ह्यांत दिव्यांग बंधू व भगिनींकरिता राखीव असलेला 3टक्के शेष निधीचे वाटप करण्याचे आदेश जिल्हयांना देण्यात आलेले आहेत. असे असताना देखील नगर जिल्ह्यातील बर्याच ग्रामपंचायती सदर आदेशाकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून आले आहे. सदर निधी इतरत्र वळवताना आढळून येत आहे.

दिव्यांगांना या योजनेपासून एक प्रकारे वंचितच ठेवले जात असून, सदर ग्रामपंचायतीने दि. 2 ऑक्‍टोबर 2018 पूर्वी सदर दिव्यांग बंधू भगिनींसाठी असणारा दि. 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या वर्षाचा 3टक्के राखीव शेष निधी खर्च करावा. अन्यथा सदर गावातील दिव्यांग बंधू व भगिनी ग्रामपंचायतीचे कोणतेही कामकाज चालू देणार नाही, असा इशारा मंचाच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे. आंदोलन करून कामकाज बंद पाडले जाणार असल्याने याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)