दिव्यांगांच्या पाच टक्के निधीचे वाटप करण्याची मागणी

कोपरगाव – कोपरगाव नगरपालिका व तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या सेस फंडातून दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के निधीचे तत्काळ वाटप करावे, अशी मागणी भाजपा दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद किशोर काळे यांनी गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांपूर्वी आम्ही नगरपालिका व ग्रामपंचायत प्रशासनाला दिव्यांग निधी वाटपाबाबत सविस्तर निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींनी या निधीचे वाटप केले. पण काही ग्रामपंचायतींकडून त्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यामार्फत पालकमंत्री प्रा. राम शिंदे व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडेही तक्रारी केल्या आहेत. दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी व स्वयंरोजगारासाठी सेस फंडातील पाच टक्के निधीचे तत्काळ वाटप करावे. अन्यथा व्यापक आंदोलन उभारले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी उपाध्यक्ष रफिक शेख, शहराध्यक्ष मुख्तार पठाण, शहर कार्याध्यक्ष स्वप्नील कडू, संदीप शहाणे, संदीप इजगे, छाया बोडखे, जय शेकटकर, मीरा पवार, आशा चोरगे, चंद्रकला गुंजाळ आदी उपस्थित होते. यावेळी दिव्यांगाच्या नावावर असलेल्या घरांना घरपट्टी व पाणीपट्टी आकारू नये, अशी मागणीही करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)