स्टोव्हचा भडक्‍याने दोन घरे भस्मसात

आगीत साडेसात लाखांचे नुकसान

पाथर्डी – मिरी ( ता.पाथर्डी) येथे स्टोव्हचा भडका होऊन लागलेल्या आगीत दोन घरे भस्मसात झाली. या घटनेत रोख रक्कम व संसारोपयोगी वस्तू जळून सुमारे साडेसात लाख रुपयाचे नुकसान झाले. गुरुवारी (दि.15) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इस्माईल लाडसाहब शेख व जावेद इस्माईल शेख यांच्या राहत्या घरात स्टोव्हचा भडका होवून लागलेल्या आगीमध्ये धान्य, संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.

-Ads-

गुरूवारी दुपारच्या सुमारास शेख यांच्या राहत्या घरामध्ये स्वयंपाक सुरू असतांना बाहेर शेळी सुटल्याने ती बांधण्यासाठी घरातील मुलगी बाहेर आली असता, घरातील स्टोव्हचा भडका झाल्याने काही क्षणात छपराने पेट घेतला. घराने पेट घेतल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र घर छप्पराचे असल्याने काही क्षणात घरातील संसार उपयोगी वस्तू, धान्य, सोने, चांदी , कपडे, रोख रक्कम या आगीमध्ये जळून खाक झाली.

यामध्ये इस्माइल शेख यांचे 3 लाख 82 हजार रुपयांचे तर जावेद शेख यांचे 3 लाख 72 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहीती समजताच सरपंच निता मिरपगार, माजी सरपंच शशीकला सोलाट, जगदीश सोलाट, कामगार तलाठी श्रीमती मनाळ, आणासाहेब शिंदे, राजेंद्र तागड , साहेबराव गवळी, संभाजी सोलाट, राजू इनामदार, अशोक झाडे, बापूसाहेब कोरडे, सत्तार गफूर, रविंद्र मिरपगार, ए. बी. सोलाट, समीर शेख यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आगीत नुकसान झालेल्या दोन्ही घराचे तलाठी मनाळ यांनी पंचासमक्ष पंचनामा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)