चार मोटारीतून साहित्याची चोरी

मोटारीच्या काचा फोडून त्यातील साहित्य चोरून नेणारी टोळी सक्रिय

नगर – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटारगाडीच्या काचा फोडून चोरांनी त्यातील सुमारे 50 हजारांचे साहित्य चोरून नेले. कोठला परिसरात हा प्रकार झाला. काही दिवसापूर्वी माळीवाडा बसस्थानकासमोरील उज्वला कॉम्प्लेक्‍ससमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन मोटारींमधून अशाचपद्धतीने साहित्याची चोरी झाली होती. अशा चोरींमुळे शहरातील रस्त्यालगत उभ्या असलेल्या मोटारीतून साहित्य चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कोठला परिसरातील राज चेंबर्ससमोरील दोन प्रार्थना स्थळामागे असलेल्या मैदानात वाहन दुरूस्तीचे गॅरेज आहे. या जागेत चार मोटारगाड्या उभ्या होत्या. चोरांनी या मोटारगाड्याच्या काचा फोडून त्यातील साहित्य चोरून नेले. बॅटऱ्या, टेपरेकॉर्डर, कीट बॉक्‍स असे सुमारे 50 हजारांचे साहित्य चोरांनी चोरून नेले आहे.

पहाटे चोरांनी ही चोरी केल्याचा अंदाज आहे. गॅरेजमधील काही कामगारांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर हा चोरीचा उलगडा झाला. या परिसरात आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलिसांनी तेथील चित्रीकरणाची पाहणी केली आहे. या कॅमेऱ्यांमध्ये काही संशयास्पद हालचाली देखील टिपल्या गेल्या आहेत. परंतु त्याची स्पष्टता अधिक नसल्याने चोरांचे चेहरे देखील दिसत नाहीत.

माळीवाडा बसस्थानकासमोर उज्वला कॉम्प्लेक्‍समध्ये काही दिवसांपूर्वी अशीच चोरी झाली होती. दोन मोटारीच्या काचा फोडून त्यातील हजारो रुपयांचे साहित्य चोरांनी चोरून नेले होते. कोठला परिसरात पुन्हा अशीच घटना झाल्याने शहरात उभ्या असलेल्या मोटारीच्या काचा फोडून त्यातील साहित्य चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)