कोळपेवाडी दरोड्याचा तपास थंडावला

-शंकर दुपारगुडे

दुय्यम कारागृहाची दयनीय अवस्था

तहसील कार्यालयात असलेल्या दुय्यम कारागृहाची अवस्था दयनीय आहे. 16 कैद्यांची क्षमता असतांना येथे 60 ते 70 कैदी अक्षरक्षः कोंबले जातात. त्यामुळे महसुल व पोलीस प्रशासनाची तारांबळ उडते. कोळपेवाडी दरोडयांतील आरोपींनी शौचालय कोरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

कोपरगाव  – तालुक्‍यातील कोळपेवाडी येथील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स संगमनेरकर सराफ या सराफा पेढीवर 19 ऑगस्ट रोजी दरोडेखोरांनी गोळीबार करून एका सराफाची हत्या करून एकास गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी राज्यभर तपासाची चक्रे फिरवून पपडया उर्फ गणपती काळे याच्या पत्नीसह 18 जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीला पकडले होते. 14 ग्रॅम सोने हस्तगत केले होते.

मात्र आज अडीच महिने उलटल्यानंतर कोळपेवाडी दरोडयाचा तपास थंडावला आहे. त्यामुळे कोपरगाव परिसरात पुन्हा घबराटीचे वातावरण पसरले आहे.

या गुन्ह्यातील 35 आरोपीतील 17 आरोपी अद्यापही फरारी आहेत. त्यामुळे पोलिसांना हे गुन्हेगार पकडण्यात अपयश आले की काय? याची चर्चा तालुक्‍यात पुन्हा सुरू झाली आहे. मुख्य आरोपी पपडया व इतर 17 जण नाशिक व इतर ठिकाणी तुरूंगात आहेत.

घाडगे परिवारावर या घटनेमुळे मोठे संकट ओढावले होते. गोळीबारात जखमी झालेले गणेश घाडगे अजुनही वैद्यकीय उपचार घेत आहेत. या जबरी धक्क्‌यातून अजूनही घाडगे कुटुंब सावरलेले नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून धीर दिला होता. या सर्वांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व आरोपींना अटक करावी म्हणून पाठपुरावा केला होता. मात्र आज अडीच महिने उलटयानंतर हा तपास बहुतांशी थंडावला आहे.

त्यामुळे पुन्हा पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात असून तपास का थंडावला आहे? याचे उत्तर मात्र पोलीसांकडे नाही. पोलीस प्रशासन केवळ तपास सुरू आहे. उर्वरीत आरोपी लवकरच पकडले जातील असे साचेबंद उत्तरे देत आहेत. त्यामुळे या आरोपींना तातडीने पकडण्यात यावे व त्यांना कडक शासन करण्याची मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)