पाणी उपश्‍याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

File photo

संगमनेर – राज्यासह तालुक्‍यात प्रचंड दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे धरणांच्या पाण्यासाठी राजकारण सुरु आहे तर दुसरीकडे दुष्काळ परिस्थितीत शासनाने आरक्षित केलेल्या पाझर तलावातून शेतीसाठी पाणी उपसा केल्याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना तालुक्‍यातील वरुडी पठार भागात  घडली आहे.

शासन आरक्षित तलावातून पाणी उपसा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही या वर्षीची पहिलीच घटना आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रोहिदास नामदेव पोखरकर (वरुडी पठार,ता. संगमनेर) असे शेतकऱ्याचे नाव असून येथील ग्रामसेवक भाऊसाहेब संपत भांड यांनी त्यांच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संगमनेर तालुक्‍यातील वरुडी पठार ग्रामपंचायत अंतर्गत ढोरवाडी येथील पाझर तलावातील संपूर्ण पाणी पिण्यासाठी शासनाने आरक्षित केले असून शेतीसाठी या पाण्याचा वापर न करण्याचे आदेश तहसिल कार्यालयातून शेतकऱ्यांना यापूर्वी देण्यात आले आहे, असे असताना रोहिदास पोखरकर यांनी शेतीसाठी पाण्याचा उपसा केला असल्याचे ग्रामसेवक भांड यांना निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 व 1995 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्‍यातील खरीपाची बहुतांश पिके वाया गेली असताना रब्बीची पिके जगविण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहेत, परंतु अशा प्रकारे पंचकृषीसाठी आरक्षित केलेल्या पिण्याच्या पाण्याचा वापर शेतकरी करू लागल्याने यापुढील सहा महिन्यांचा काळ किती भीषण असणार याची प्रचिती या घटनेने उघड केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)