कर्जमंजुरीसाठी कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे उपोषण 

नेवासा फाटा – जिल्हा उद्योगकेंद्रात उदयोगधंद्यासाठी लागणाऱ्या कर्जप्रकरणाला मंजुरी मिळाल्यानंतरही नेवासा येथील सेंट्रल बॅंकेमध्ये कर्जप्रकरण मंजुरीसाठी होत असलेल्या अडवणूकीच्या निषेधार्थ कॉंग्रेस अल्पसंख्याक नेवासा तालुका आघाडीचे तालुकाध्यक्ष जाकिरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगार युवकांनी उपोषण केले, अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. तसेच जाकिरभाई शेख यांनी आत्मदहन करण्याचा निर्णयही मागे घेतला.

नेवासा येथील काही अल्पसंख्याक बेरोजगार युवकांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे उद्योग व्यवसायासाठी अर्ज केले होते. ते अर्ज मंजूरही झाले म्हणून या युवकांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्जप्रकरण दाखल केले. मात्र यासाठी त्यांची अडवणूक होऊन त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती, असा आरोप या युवकांनी दिलेल्या निवेदनात केला.

-Ads-

याबाबत दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा जाकीरभाई शेख यांनी दिला होता. यावेळी नव्याने प्रकरण दाखल करा, कर्जमंजुरीसाठी विचार करू असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी उपोषणकर्ते युसूफ शेख, एजाज पटेल, जावेद शेख, आसीर पठाण यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, गोपनीय विभागाचे बाळासाहेब घुगरकर, शाखाधिकारी खापरे, पोलीस कॉन्स्टेबल खेडकर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)