बोगस मतदारांना निवडणूक आयोगाचा दणका

श्रीगोंदे  – जानेवारी 2019 मध्ये होणाऱ्या श्रीगोंदे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 1 सप्टेंबर 2018 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीच नगरपरिषदेसाठी लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छुकांनी वाढवलेल्या बोगस मतदारांना दणका बसला आहे.

गेल्या तीन महिन्यापासून इच्छूक उमेदवारांनी मतदार नोंदीत अनेक बोगस नावांचा भरणा केल्याची चर्चा होती. मात्र 1 सप्टेंबर 2018 अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी प्रभागनिहाय विभागून वापरावयाची आहे.

त्यानुसार श्रीगोंदे नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या 23413 इतकी असणार आहे. त्या प्रमाणेच इच्छूक उमेदवारांना आपले नामनिर्देश पत्र निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरच दाखल करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)