नेवाशातील दीड लाखांच्या धूमस्टाईलची लूट उघडकीस

पाच जणांची टोळी जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

नगर – हांडी निमगांव (ता. नेवासे) येथे धूमस्टाईलने लूट करणाऱ्या दुचाकीच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी रोख रक्कम एक लाख पाच हजार, गुन्ह्यात वापरलेल्या 95 हजारांच्या दुचाकी, असा एकूण 1 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नितीन मोहन राशीनकर (वय 25, रा. कारेगांव), फरनाह अरीफ पठाण (वय 20, रा. गहिले वस्ती), विजय भास्कर मोहिते (वय 21, रा. साठेनगर), शाहिद कुतूबुद्दीन शेख (वय 21), सागर हरिभाऊ हरवणे (वय 19, दोघे रा. वडुले बुद्रुक, ता. शेवगाव) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अशोक शेंडे यांचा नेवासे तालुक्‍यात दुमाला शिवारात पेट्रोल पंप आहे. या पंपावर 12 नोव्हेंबरला दिवसभर जमा झालेली सुमारे 1 लाख 63 हजार 340 रुपयांची रक्कम व्यवस्थापक शेंडे भरण्यासाठी बॅंकेत निघाले होते. नगर-औरंगाबाद रोडवर हांडी निमगांव शिवारात ते दुचाकीवरून आले असताना त्यांच्याकडील रक्कम दुचाकीवरून आलेल्या वरील पाच जणांच्या टोळीने लुटून नेली होती.

शेंडे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांची टिम या गुन्ह्याचा समांतर तपास करत होती. पोलीस निरीक्षक पवार यांना खबऱ्यांकडून माहिती मिळताच त्यांनी नितीन राशीनकर याला नेवाशातून ताब्यात घेतले.

पवार यांच्या चौकशीसमोर नितीन जास्त काळ टिकू शकला नाही. नितीन याने गुन्ह्याची माहिती दिली. नितीन याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी इतर चौघांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. या चौघांनी देखील गुन्ह्याची माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी या पाच जणांना नेवासे पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)