सरकार ओबीसी विरोधी- ईश्वर बाळबुधे 

ओबीसी सेल मतदार संघनिहाय आढावा बैठकीत ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रदेश उपाध्यक्ष ऍड.सचिन औटे आदी.

ओबीसींनी आशुतोष काळेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे

कोपरगाव – 2014 च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान आरक्षणाचे आश्‍वासन देवून सत्तेत आलेल्या सरकारने आरक्षणच काय पण दिलेली कोणतीच आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. या थापाड्या सरकारने सर्व जाती धर्माच्या नागरिकांना फसविले. ओबीसी समाजावर आजपर्यंत अन्याय केलेला आहे. ओबीसी समाज बांधवाना न्याय मिळावा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघात ओबीसी समाजाने आशुतोष काळे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी कोपरगाव येथे केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ओबीसी सेल मतदारसंघ निहाय आढावा बैठक गौतम सहकारी बॅंकेच्या सभागृहात पार पडली यावेळी बाळबुधे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्येच निर्णय घेऊ असे सांगणाऱ्या सरकारने आजपर्यंत धनगर समाजाला झुलवत ठेवले आहे. मुस्लीम समाजाला आरक्षण नाही, मराठा समाजाचे आरक्षण कोर्टात नेवून ठेवले आहे. ओबीसी नेत्यांवर सूडबुद्धीने हे सरकार कारवाई करीत असून भुजबळ साहेब या सरकारच्या दडपशाहीचे बळी ठरले आहेत. हे सरकार ओबीसी समजाला कधीही न्याय देणार नाही. ओबीसी समाजाचे प्रश्न फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच सोडवू शकतो. त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघात युवा नेते आशुतोष काळे यांना ताकद देण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सचिन औटे, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, विजय आढाव, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक विरेन बोरावके, संदीप पगारे, दादासाहेब कोकरे, सुरेंद्र सोनटक्के आदी मान्यवरांसह ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)