रात्रीच्या गस्तीसाठी हजेरी पुस्तिका उपक्रम सुरू

नेवासे – नेवासे शहरात पोलीस ठाण्याच्या वतीने रात्रीची गस्त सुरू करण्यात आली असून नेवासा शहरातील मुख्य चौकासह महत्वाच्या ठिकाणी गस्त हजेरी पुस्तिका लावण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू केला आहे.

नेवासे शहरात पोलीस कर्मचारी हे ठरवून दिलेल्या परिसरात रात्रीची गस्त घालणार आहेत. यावेळी दिलेल्या पॉईंटवर लावण्यात आलेल्या गस्त पुस्तिकावर गस्तीवरील पोलीस सही करणार आहेत. शहरात चोरी, घरफोडी, इतर छोटया मोठ्या घटना होऊ नये यासाठी गस्तीद्वारे नियंत्रण कसे ठेवता येईल याचा विचार करून रात्रीच्या गस्तीचा हा उपक्रम नव्याने आलेले पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.

-Ads-

या उपक्रमाचा प्रारंभ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या हस्ते एटीएम असलेल्या महाराष्ट्र बॅंक, सेन्ट्रल बॅंक, स्टेट बॅंक, सराफ बाजार, नेवासाफाटा रिमोट एरिया या ठिकाणी तसेच नेवासा शहरातील प्रत्येक चौकात गस्त हजेरी पुस्तिका लावून करण्यात आला आहे.

या उपक्रमात पोलीस निरीक्षक रणजित डेरे हे स्वत: गस्तीमध्ये सहभाग घेणार आहेत. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गौतम वावळे, प्रमोद भिंगारदे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे,गोपनीय विभागाचे बाळासाहेब घुगरकर, पो.कॉ.दिलीप कुऱ्हाडे उपस्थित होते. नेवासे पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मोठ्या गावांमध्येही हा उपक्रम बिटप्रमुखामार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक डेरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)