शनिशिंगणापूर येथे शेतकरी वारकरी संमेलनाचे आयोजन

नेवासे – मराठा महासंघ व मराठा शेतकरी महासंघाच्यावतीने शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे गुरुवारी (दि.15) दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिली.

संमेलनात राष्ट्रसंत तनपुरेबाबा मराठा भूषण पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज पुतळा पुननिर्माण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे हे राहणार असून यावेळी खासदार उदयनराजे भोसले, महसूल व कृषीमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महंत भास्करगिरी महाराज, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार, खासदार सी.आर.पाटील, विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी खासदार दिलीप गांधी, चंद्रकांत खैरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, तुकाराम गडाख, आमदार भाई जगताप, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार अनिल राठोड, बबन पाचपुते, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, भानुदास बेरड, अतुल शिरोळे आदी उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन दहातोंडे, दिलीप जगताप, रणजित जगताप, संतोष नानावटी, विरेंद्र पवार, कविता भोसले, शिवाजी डौले, रमेश बोरुडे, बाळासाहेब बानकर, बापूसाहेब शेटे, सयाराम बानकर, सुनंदा दहातोंडे, नरेंद्र मोहिते, सुभाष झांबड आदिंनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)